इम्रान खान यांना जामीन मंजूर

इम्रान खान यांना जामीन मंजूर

मुंबई, १२ मे २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे.

यापूर्वी इम्रान खान यांना ९ मे रोजी अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर इम्रान यांना अटक झाली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. इम्रान खान यांच्या अटकेचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले. इम्रान खान समर्थक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी इम्रान समर्थकांकडून जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे समर्थकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर ११ मे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version