Important Warning for Fishermen: मच्छिमारांनो जरा सांभाळून! समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; प्रशासनाकडून 3 नंबरचा बावटा जारी

मच्छिमारांसाठी मत्स्यविभागाकडून 3 नंबरचा बावटा जारी म्हणजेच धोक्याचा इशारा जारी केला आहे.
Important Warning for Fishermen: मच्छिमारांनो जरा सांभाळून!  समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; प्रशासनाकडून 3 नंबरचा बावटा जारी

सध्या राज्यभरात पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. आजपासून पुढील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन नागरिकांना  प्रशसनाने केलं आहे. अशातच आता मच्छिमारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. 

रत्नागिरी मच्छिमारांसाठी मत्स्यविभागाकडून 3 नंबरचा बावटा जारी म्हणजेच धोक्याचा इशारा जारी केला आहे. त्याचप्रमाणे समुद्राला मोठी भरती असून खोल समुद्रात वादळी परिस्थिती असल्याने आत जाणे टाळावे असंही सांगितलं आहे. 

हेही वाचा – Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो लक्ष द्या! दादर–सायन–किंग सर्कल परिसरात साचलं पाणी; लोकल सेवा उशिराने, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलले 

प्रशासनाने  खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असे हवामान विभागाचे आवाहन केले. पुढील काही तासात स्थिती अधिक गंभीर होण्याचा अंदाज आहे. यादरम्यानच मत्स्यविभागाकडून 3 नंबरचा बावटा जारी केला आहे. यादरम्यान मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मच्छिमारांना  मच्छिमारी करण्यास मज्जाव घालण्याता आला आहे. 

हेही वाचा – Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो लक्ष द्या! दादर–सायन–किंग सर्कल परिसरात साचलं पाणी; लोकल सेवा उशिराने, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलले 

दरम्याने काही ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकरी मात्र सुखावला आहे. पेरणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे . सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात रोहिणीला सुरुवात झाली असून, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांनीही आता पावसाचा फायदा घेत पेरणी सुरू केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version