IMD Rain Update : तारीख ठरली, राज्यात पुन्हा धो-धो पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाची नवी अपडेट समोर

मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पाऊस नेमका पुन्हा कधी सक्रिय होणार? अशी चिंता व्यक्त केली जातेय
IMD Rain Update : तारीख ठरली, राज्यात पुन्हा धो-धो पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाची नवी अपडेट समोर

जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुरु झालेल्या पावसाने राज्याला 4 ते 5 दिवसांत झोडपून काढले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत 24 तासांत 200 ते 300 मिमी पर्यंत विक्रमी पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर गेल्या आठवडाभरापासून पावसाने अचानक विश्रांती घेतली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावली आणि पावसावर परिणाम झाला. परिणामी वाढलेली आर्द्रता आणि प्रचंड उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, पावसाअभावी शेतीची कामेही अनेक भागांत रखडली आहेत. पाऊस नेमका पुन्हा कधी सक्रिय होणार? पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज काय आहे? आणि मुंबईसह कोकण व राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा- Monsoon Update: विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा कोसळणार धो धो पाऊस; 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा, कोकणासह 'हे' जिल्हे…

हवामान खात्याने नवीन अंदाज वर्तावला आहे. त्यानुसार, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या अनुकूल हवामान प्रणालीमुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई आणि उपनगरांमध्ये पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

18 जुलैनंतर मुंबई, ठाणे, कोकण आणि घाट परिसरात धो-धो पावसाची दमदार एन्ट्री होणार आहे. यावेळी 18  जुलैनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तावण्यात येत आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा असून शेतकरी आणि नागरिकांनाही या पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version