‘पुन्हा बोललात तर मातोश्रीत घुसू’

‘पुन्हा बोललात तर मातोश्रीत घुसू’

उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. ‘पुन्हा बोललात तर मातोश्रीत घुसू’ असा थेट धमकीवजा इशारा दिला आहे.

‘… ही शेवटची चेतावणी’

“आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा. ही धमकी आहे, असं समजा. यानंतर तुम्ही आमच्या राज्याच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही. तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही नैराश्य आल्यामुळे असे वागत आहात, उद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही तुम्हाला सोडेल पण, आमच्या नेत्याला बोलाल, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला ही आमचा शेवटची चेतावणी आहे,”

‘फडणवीस शांतपणा सोडा, रौद्ररूपात या’

“देवेन्द्रजी तुमचे संस्कार तुमच्याकडे ठेवा आता तुमच्याबदल कोणी काही बोललं तर आम्ही त्याला सोडणार नाही.” , असे बावनकुळे म्हणाले आहेत. “पाच वर्षात देवेंद्रजींकडून तुम्ही काय काय करून घेतलेत हे आठवा, देवेंद्रजीं जर बोलायला लागले तर, उद्धव यांचे घरातून बाहेर निघणे अवघड होईल”, असेही बावनकुळे म्हणाले. तसेच, ‘फडणवीस शांतपणा सोडा, रौद्ररूपात या’ असे आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे.

काय बोलले होते उद्धव ठाकरे ?

“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे, अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जात आहे. मला वाटते फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

नेमकं प्रकरण काय ?

ठाण्यात शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी उद्धव गटाची एक महिला रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. यानंतर, उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यातील रुग्णालयात जाऊन त्या महिलेची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर आगपाखड केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version