‘अशीच नौटंकी केली तर तेलंगणातच पराभव होईल’

‘अशीच नौटंकी केली तर तेलंगणातच पराभव होईल’

भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे ६०० गाड्यांच्या लवाजम्यासह पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले. दरम्यान, त्यांच्यावर “एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच केसीआर देखील पैशांचे आणि सत्तेचे ओंगळवाणे प्रदर्शन करत आहेत.” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

काय म्हणाले राऊत?
यावेळी राऊत म्हणाले की, “खरंतर केसीआर आणि आमचे वयक्तिक संबंध अत्यंत चांगले आहेत. ते आमचे मित्र आहेत. मात्र त्यांनी ठरवायला हवं की आपण नक्की कोणाविरुद्ध लढणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काहीच परिणाम होणार नाही. तेलंगणाच्या राजकारणावर मात्र याचा परिणाम होणार आहे. केसीआर अशीच नोटंकी करत राहिले “तर तेलंगणात त्यांचा पराभव होईल. त्याच पराभवाच्या भीतीने ते आता महाराष्ट्रात शिरले आहेत. महाराष्ट्रात ते गाड्यांचा ताफा घेऊन आले मात्र दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला आहे. अनेक माजी खासदार आणि आमदार कॉंग्रेस मध्ये गेले आहेत. खरंतर ही लढाई केसीआर आणि कॉंग्रेस यांच्यात आहे. यावर आम्ही बसून चर्चा करू शकतो. मात्र तेलंगणामध्ये जे राजकारण सुरु आहे त्याचा बदला तुम्ही महाराष्ट्रात घेताय याचा अर्थ तुम्ही भाजपसाठी काम करत आहात. याचा परिणाम तुम्हाला तेलंगणामध्ये भोगावा लागेल. इथे महाविकास आघाडी मजबूत आहे आणि मजबूत राहणार त्यामुळे इथे त्याचा काहीच परिणाम होणार नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version