‘माझा पाठिंबा होता, तर सरकार का पडलं ?’

‘माझा पाठिंबा होता, तर सरकार का पडलं ?’

२०१९मध्ये निवडणुकीनंतर झालेल्या पाहटेच्या शपथ विधीवरुन राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आमच्यावर डबलगेम केला त्यामुळेच आमचे सरकार येऊ शकले नाही. सगळी चर्चा शरद पवारांशीच झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे त्यावेळी पवार-फडणवीस यांच्या भेटीगाठी झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पाठिंबा देण्याची भूमिका ही ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होती त्यावेळेला जाहीर केली होती. तो त्या काळचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात जे त्यांनी सांगितले की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली ही गोष्टही खरी आहे. त्यांनी स्वत: सांगितलंय की, यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं. मी दोन दिवसांत धोरण बदललं तर सोबत यायचं काय कारण होतं? त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? शपथ घ्यायची होती तर ती अशी चोरुन पहाटे का घेतली?, असा सवाल शरद पवार यांनी केला.

आमचा त्यांना पाठींबा होता तर ते सरकार दोन दिवसांत राहिलं का? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची भूमिका होती ती एकदा समाजासमोर यायला हवेत या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं. “देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेसाठी काय करु शकतात, कुठे जाऊ शकतात, हे सगळं समजण्याची ही स्थिती आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

हा डाव होता का ते मला माहिती नव्हते. पण कदाचित लोकांना तुम्हाला माहिती असेल की नसेल ते मला माहिती नव्हते. पण माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सधू शिंदे असं होतं. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. या गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या लोकांचे विकेट घेतले होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? मी जरी खेळलो नसलो तरी माहिती होतं. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version