सगळं काही चुकलं तर मग सरकार का वाचलं?

सगळं काही चुकलं तर मग सरकार का वाचलं?

इतके दिवस राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या प्रश्नावर अखेरीस गुरुवारी फैसला झाला. या निकालात ठाकरे गटाचा पराभव झाला असून शिंदे-भाजपा सरकार कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्तासंघर्षाच्या या निकालात उद्धव गटाचा पराभव झाला असून उद्धव ठाकरेंची पुनर्स्थापना शक्य नाही असा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर शोकाकुलाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. तर, उद्धव गटात निराशा पसरलेली दिसत आहे. निराश झालेल्या ठाकरे गटाकडून सगळं चुकलं, तरी सरकार बचावल असं म्हंटल जात आहे.

सगळं काही चुकलं तर मग सरकार का वाचलं?
उद्धव ठाकरे गटाच्या म्हणण्याप्रमाणे जर सगळं काही चुकलं, तरी सरकार बचावलं असं असेल तर मग सगळं काही चुकलं तर मग सरकार का वाचलं? हेही तितकंच महत्वाचे आहे. उद्धव ठाकरेंचा पराभव हा त्यांनी केलेल्या चुकांमुळे झालेला परिणाम आहे. आणि शिंदे गटाचा विजय हा त्यांच्या आजवरच्या कामकाजामुळे झाला आहे. उद्धव ठाकरे गटाने आजवर फक्त चुका करत त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. त्याचंच फळ आज त्यांना मिळालं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version