तुम्ही बॅंकेत 50 हजार जमा करायला नेताय? तर हे घेऊन जाणे अनिवार्य

तुम्ही बॅंकेत 50 हजार जमा करायला नेताय? तर हे घेऊन जाणे अनिवार्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तुम्ही बँकेत 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करण्यासाठी नेणार आहात का? लक्षात असू द्या की, तुम्हाला हे पैसे बँकेत सहज जमा करता येणार नाही. कारण एवढी रक्कम बँकेत जमा करायची झाल्यास आता तुम्हाला स्वत:चं ओळखपत्रदेखील जमा करावं लागणार आहे.

सरकारनं मनी लाँन्ड्रिंग कायद्यात दुरुस्ती करून ओळखपत्र दाखवणं अनिवार्य केलेल आहे. विषेश म्हणजे रक्कम जमा करताना ओळखपत्राच्या प्रतीसोबत ‘ती प्रत मुख ओळखपत्राशी जुळवली आहे’  असेही त्यावर लिहिण्यात येणार आहे.

ओळखपत्राबाबत फसवणूक टाळण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version