‘पवारांच्या निर्णयानंतर मी बोलेन’

‘पवारांच्या निर्णयानंतर मी बोलेन’

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येत आहेत त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील वक्तव्य केले आहे. माझा सल्ला शरद पवारांना पचनी पडला नाही तर मी काय करु? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. असं देखील ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय व आपल्या आत्मचरित्रात त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत केलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेतली. शरद पवार सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतील. मी त्यांना कसा सल्ला देऊ शकतो? असं ठाकरे म्हणाले.

“मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला त्यांच्या अंतर्गत बदल करण्याचा अधिकार असतो. महाविकास आघाडीला तडा जाईल असं राष्ट्रवादीत काही घडेल असं मला वाटत नाही. शरद पवारांच्या निर्णयानंतर मी बोलेन. माझा सल्ला पवारांना पचनी पडला नाही तर मी काय करु? मी शरद पवारांना सल्ला कसा देऊ. पवारांच्या निवृत्तीचा निर्णय अंतिम निर्णय नाही. मला व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करायचा आहे. हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.” अशी भुमिका ठाकरेंनी मांडली.

“प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातील प्रत्येकाला कुटुंबाचा सदस्य वाटतो. त्यापेक्षा मी अधिक बोलणार नाही. शिवाय वज्रमुठ सभांच्या तारखा बदलत आहोत, लोक सभांसाठी दुपारपासून येतात, त्यामुळे उन्हाळा पाहाता या सभांच्या तारखा बदलणार आहोत.” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version