‘लवकरच एका आयपीएसचा पर्दाफाश करीन’; मोहित कंबोज यांचा इशारा

‘लवकरच एका आयपीएसचा पर्दाफाश करीन’; मोहित कंबोज यांचा इशारा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली आहे. तब्बल आठ चौकशीनंतर मलिकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मलिकांवर झालेल्या कारवाईमुळे मविआमधील अनेक बडे नेते निदर्शने करत आहेत. दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि नवब मलिकांना इशारा दिला आहे.

मोहित कंबोज यांनी ट्विट केले की, नवाब मलिक आणि संजय राऊत केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय बदनाम करत आहेत. यासंदर्भात आम्ही बोलत नाही पण तुमच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची काळी अक्षरे आमच्याकडे आहेत. लवकरच मी आयपीएस अधिकाऱ्याची माहिती पुराव्यासह उघड करणार आहे. सलीम-जावेद यांचा गौप्यस्फोट करणार असल्याचे मोहित कंबोज ट्विट द्वारे म्हणाले आहेत.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1497438999853424647?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1497438999853424647%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Fbjp-leader-mohit-kamboj-warning-sanjay-raut-and-nawab-malik-will-expose-ips-officer-connection-with-proof-a629%2F

मलिकांच्या कारवाईचा जल्लोष पडला महागात

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी आनंद साजरा केला. कंबोज यांनी आपल्या समर्थकांसोबत स्वत:च्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. मात्र उत्साहाच्या भरात केलेल्या एका कृतीमुळे आता कंबोज अडचणीत आले आहेत. यावेळी भाजप समर्थकांनी पक्षाचे झेंडे घेत जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा केल्या. उत्साहाच्या भरात मोहित कंबोज यांनी म्यानातून तलावार काढून ती हवेत फिरवत जल्लोष साजरा केला. त्यामुळे याप्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version