Rohit Pawar On Black Box :’ब्लॅक बॉक्सचा फोटो माझ्याकडे, किती जळालाय हे मला माहित’, अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांकडून खळबळजनक दावा

रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठी माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक गंभीर वळण मिळाले असून रोहित पवारांनी ब्लॅक बॉक्स संदर्भात खळबळजनक दावा केला आहे.
Rohit Pawar On Black Box :’ब्लॅक बॉक्सचा फोटो माझ्याकडे, किती जळालाय हे मला माहित’, अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांकडून खळबळजनक दावा

राज्यात आजपासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस हा अजित पवारांच्या आठवणीत गेलेला दिसून आला. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनातील वातावरण भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडले. त्याप्रमाणे अजित पवार यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. याचवेळी रोहित पवार यांनीदेखील शोकप्रस्ताव मांडला. यावेळी रोहित पवार खूप भावूक झालेले दिसून आले. 

हेही वाचा- Haryana : शिवरायांचा पुन्हा अपमान, रिसॉर्टमधील वॉशरूमच्या साईन बोर्डवर महाराजांची प्रतीमा; शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप
यादरम्यान रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठी माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाता संदर्भातील ब्लॅक बॉक्सचा फोटो माझ्याकडे आहे ब्लॅक बॉक्स किती जळालाय हे मला माहित आहे अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात रोहित पवार यांनी ही माहिती दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावे केले आहेत. ज्यामुळे आता या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले असून या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच त्यांनी ब्लॅक बॉक्स संदर्भात खळबळजनक दावा केला आहे.

हेही वाचा- Buldhana Chikhla News : संजीवनी वाघ यांचे कपडे कोणी फाडले? चिखला गाव वादातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; Viral Video
रोहित पावर म्हणाले की, “ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे तो कसा आहे किती जळला याची डिटेलसुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एविएशन मंत्रालय याबाबतीत कसा तपास करते, काय करते. त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेल्या आहेत याची माहिती सुद्धा तिथे आम्हाला कळालेली आहेत. त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्वेस्टीगेशन करणं हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण का पारदर्शक इन्वेस्टिगेशन मुळेच कुठेतरी दादांना न्याय मिळू शकतो अशी आमची भूमिका आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version