हैदराबाद बलात्कार प्रकरण: सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात

हैदराबाद बलात्कार प्रकरण: सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात

हैदराबाद: चार दिवसांपूर्वी झालेल्या युवतीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी टीकेचे धनी झालेले मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज आपले मौन सोडले आहे.

या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात येणार असून फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. लवकर तपास पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version