हृतिकची खास इच्छा

हृतिकची खास इच्छा

मुंबई, ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडचा चार्मिंग अभिनेता हृतिक रोशनच्या अभिनयासह त्याच्या डान्सचे देखील करोडो चाहते आहेत. डान्स कोणताही असो हृतिकचा स्वॅग पाहून चाहते नेहमीच वेडे होतात. दरम्यान नुकतेच त्याने आपल्या डान्स स्टाईल बद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आपल्या डान्स बदल बोलताना हृतिक म्हणाला,’जेव्हा मी एकटा डान्स करतो तेव्हा मला बरं वाटतं, छान वाटतं, पण जेव्हा माझ्यासोबत दुसरी व्यक्ती असते त्यावेळी आमच्यात समन्वयाची गरज असते, मात्र हे कौशल्य मी कधीच मिळवू शकलो नाही. आणि मला आता ते शिकायचे आहे.”

पुढे आपल्या काही गाजलेल्या डान्स स्टेप्सबद्दल बोलताना तो म्हणाला,” मला ‘गुजारिश’मध्ये डान्स फॉर्मसाठी ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली . तो एक अविश्वसनीय अनुभव होता. त्यावेळेस मला एक स्टेप जमत नव्हती म्हणून ३,४ वेळा परत त्याचे शूट करावे लागले.” यानंतर तो म्हणाला,”माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील गाजलेल्या काही स्टेप्समध्ये ‘बँग बँग टायटल ट्रॅक’, ‘वॉर’मधील ‘घुंगरू’ आणि ‘कोई मिल गया’मधील ‘इट्स मॅजिक’ यांचा समावेश आहे, असे हृतिकने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version