उर्फीच्या हातात बेड्या कशा ?

उर्फीच्या हातात बेड्या कशा ?

   उर्फी जावेद हिने समाजमाध्यमांवर हातात बेड्या घातलेला नवा फोटो टाकला जो फोटो आता चर्चेचा विषय बनला आहे. उर्फीच्या कपड्यांवरून चाकणकर आणि वाघ यांच्यात वाद पेटलेला असताना मॉडेल उर्फी जावेद हिने नवा फोटो समाजमाध्यमांवर टाकला आहे. या फोटोत उर्फीने बेड्या घातल्या आहेत. उर्फीने हा फोटो ट्विटरवर टाकत ‘अखेर बेडी पडलीच’ असं म्हटलं आहे, तर इन्स्टाग्रामवर, ‘तुम्हा सर्वांना मला असे बेडीतच पहायचे होते, बरोबर ? इच्छा मान्य’, असे म्हटले आहे.
उर्फी जावेद तोकडे कपडे घालून समाजमाध्यमांवर फोटोज् व रील्स टाकत असते यावरून भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यात वाद पेटलेला आहे. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर दोघीनींही एकमेकींना कायदेशीर नोटीसही पाठविली असताना आता उर्फी जावेद हिने बेडी घातलेला फोटो समाजमाध्यमांवर टाकला आहे. या फोटो सोबत दिलेल्या मजकुरातून, राजकारण्यांकडून सुरु असलेल्या टीकेला आव्हान दिल्यामुळे अटकेची शक्यता उर्फी व्यक्त करत आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version