घर, गोठ्याला आग लागल्याने सर्व खाक

घर, गोठ्याला आग लागल्याने सर्व खाक

घर व गोठ्याला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तुसह १८ शेळ्या व एक गाय जळून ठार झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मौजा मलपुरी येथे घडली आहे. देवेंद्र सीताराम कोवाची यांच्या घर व गोठ्याला मध्यरात्री अचानकच आग लागल्याने संपूर्ण घरातील जीवनोपयोगी सामान नष्ट झाले. तर सोबतच १८ शेळ्या व एक गाय आगीत जळून राख झाली आहे.

गावकऱ्याच्या मदतीने आगिवर नियंत्रण मिळविले मात्र, घर आणि गोठ्याला लागलेल्या आगीने देवेंद्र कोवाचे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग नेमकी कशी लागली याविषयी माहिती मिळू शकली नाही. आता त्वरित पंचनामा करीत शासनाकडून मदत मिळण्याची मागणी जोर धरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version