इंदापूरात डोळ्याचे पारणे फेडणारे अश्वप्रदर्शन

इंदापूरात डोळ्याचे पारणे फेडणारे अश्वप्रदर्शन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यातील इंदापूरच्या शिवलीलानगर डाळींब मार्केट परिसरात भव्य अशा शरद कृषि महोत्सवाला 5 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यात 300 हून अधिक अश्व देशभरातून सामिल झाले होते. अशा प्रकारच्या या पहिल्या वहिल्या घोडे बाजारात पंजाब, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली अशा विविध भागातून विक्रीसाठी घोडे आले होते.

येत्या 2 दिवसात ही अवक पुन्हा वाढणार असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. 50 हजार ते 50 लाखांपर्यतच्या किमतीचे घोडे इथे विक्रीसाठी उपल्बध आहेत. सध्या याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची भावना इंदापूर कृषि ऊत्पन्न बाजार समीतेचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version