काचा फोडून घोडा घुसला कारमध्ये

काचा फोडून घोडा घुसला कारमध्ये

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जयपूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. बेकाबू होऊन उधळलेला एक घोडा थेट एका कारमध्ये घुसला.

 

घोडा इतक्या वेगानं या गाडीत घुसला की त्याच्या धडकेत कारचालक आणि घोडा दोघेही जखमी झाले.

 

जयपूर क्लबजवळून कार जात असताना हा घोडा अचानक कारसमोर आला.

 

काही कळायच्या आतच हा घोडा थेट कारमध्ये घुसला. यात कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

 

स्थानिकांच्या मदतीनं अथक प्रयत्नांनी या घोड्याला काही काळानं बाहेर काढण्यात आले. मात्र, या अपघातात कारचा मात्र चक्काचूर झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version