गृहमंत्र्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक

गृहमंत्र्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत पार पडलेल्या सभेत भोंगे उतरवण्याबाबत ४ तारखेचा इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावर, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईत बैठक घेत पुढील निर्णय ठरवू असे सांगितले होते. त्यानुसार आज दिलीप वळसे-पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग ऍक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्यात कुठल्याही घटना घडू नये यासाठी आम्ही तयारीत आहोत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन कोणीही करून चालणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सक्षम असल्याचं त्यांनी सांगितले.

पोलीस महासंचालकांची पत्रकार परिषद

मंगळवारी दुपारी १ वाजता पोलीस महासंचालकाची पत्रकार परिषद झाली त्यात त्यांनी ‘समाजकंटकांवर कारवाई केली जाणार आहे असं पोलीस महासंचालक यांनी म्हटलं आहे. तसेच औरंगाबाद पोलीस आयुक्त कारवाई करण्यास सक्षम आहे असेही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या भाषणाचा आयुक्तांनी अभ्यास केला असून पोलिसांनाही कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत, असे पोलीस महासंचालक रजनीश शेठ म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार असल्याचही दिसून येत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version