फडणवीसांचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले

फडणवीसांचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले

भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नवनीत राणा यांना कोठडीत अमानवीय वागणूक देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. मात्र, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, भाजपचे सरकार असतानासुद्धा राणा दाम्पत्यांवर अशापद्धतीने कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे जबाबदार नेत्यांनी जातीचे राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया वळसे-पाटील यांनी दिली आहे.

काय आहेत फडणवीसांचे आरोप?

सोमवारी महाराष्ट्र भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नवनीत राणा यांना कोठडीत अमानवीय वागणूक देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. नवनीत राणा यांना तुरुंगात अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली. पिण्याचे पाणी दिले जात नाही, वॉशरुमला जाऊ दिले नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित त्यांना दिली जात असलेल्या वागणकीबाबत तकार केली असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version