बुलढाणा जिल्ह्यात होळी सणानिमित्त ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने होलीका दहन करण्यात आले आहे. मात्र या होळी सणा दरम्यान होळीमध्ये पेटवण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल केली जात असते. यावर्षी होलिका दहन करताना सर्वांनी पर्यावरण बचावासाठी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गवत आणि इतर साहित्य वापरून होलिका दहन करण्यात आले आहे. होळीमध्ये यंदा कमी प्रमाणात लाकडे वापरल्या गेली असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात होळीसाठी वृक्षतोड झाली नाही, या माध्यमातून पर्यावरण बचावासाठी सर्वांनीच सामूहिक प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय.
कमी प्रमाणात वृक्ष तोड केल्यामुळे पर्यावरणाचे ही नुकसान कमी प्रमाणात झाले आहे. असंच जर प्रत्येकाने पर्यावरणाचे नुकसान न करता प्रत्येक सण साजरा केला तर सण साजरा करण्याचा आनंदही मिळेल आणि पर्यावरणाचं नुकसान न करण्याचं समाधानही मिळेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.