जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली
हिंगोली जिल्हातील 53 हजार हेक्टर जमीनीवरील कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने 33% पेक्षा जास्त कापसाचं नुकसान झालंय. असा अहवाल जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 36 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे सादर केली असल्याचं कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांनी सांगितलंय.
बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने ताबडतोब नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे 36 कोटींची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केल्या असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.