जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंद होता. हिंगोली येथे बुधवारी ऐवजी गुरुवारी बंद करण्याच आवाहन आंबेडकरवादी संघटनांकडून करण्यात आले.
हिंगोली शहरात तुलसी रामायण कथेचा समारोप होता, त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणुन गुरूवारी बंद चा निर्णय घेण्यात आला.
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात जातीवाद फोफावत असताना हिंगोली येथे सामाजिक एकतेचे उदाहरण दिसले.
आम्ही सारे एक ही भावना हिंगोली करानी दाखवून दिली. हिंगोली बंद असल्यामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आदेश दिले, त्यानुसार शाळा महाविद्यालय बंद आहेत.
व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहे. एसटी महामंडळाने देखील आपले एसटी सेवा बंद केली आहे. आंबेडकरवादी संघटनेचे कार्यकर्ते गांधी चौकात जमून बंद चे आवाहन करत आहे.
हिंगोली शहरासह आज सेनगाव, नरसी नामदेव सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.