ट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात

ट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात

इंग्रजी भाषेचा वापर जगभरात केला जात असला तरीही ट्विटरवर मात्र या भाषेने भारतीयांची मनमे जिंकलेली नाहीत अर्थात ही भाषा भारतीयांना आपलं करू शकली नाही.

भारतात हिंदीतील ट्विटच सर्वात जास्त लोकप्रिय आहेत ही सर्वात मोठी गोष्ट एका अभ्यासातून समोर आली आहे.

मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक लिझ बोजार्थ आणि जियोजीत पाल यांनी या विषयाची पाहणी केली, त्यानुसार 2014 मध्ये इंग्रजीत ट्विट करणारे अधिक लोक सक्रिय झाल्यामुळं भारतात सोशल मीडियाचा प्रसार वेगानं झाला असला तरी भारतीय नागरिकांना हिंदी भाषेत केलेले ट्विटच जास्त आवडतात आणि इतकेच नव्हे तर ते मोठ्या प्रमाणावर शेअरही केले जातात.

गेल्या वर्षी भारतातील राजकीय नेत्यांच्या सर्वाधिक री-ट्विट् झालेल्या ट्विटमधील 15 पैकी 11 ट्विट हिंदी भाषेतील होते असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार 2016च्या शेवटच्या 6 महिन्यांत भाजप आणि काँग्रेस बरोबरच इतर प्रादेशिक पक्षांनी हिंदीत केलेल्या ट्विटला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

मात्र हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त स्थानिक पक्षांनी इतर प्रादेशिक भाषांत केलेल्या ट्विट्सना तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याचंही अहवालात म्हंटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version