हिमाचल प्रदेशात नदीत अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेचा थरार सोशल मीडियावर व्हायरल

हिमाचल प्रदेशात नदीत अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेचा थरार सोशल मीडियावर व्हायरल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

हिमाचल प्रदेशच्या नदीत अडकलेल्या 3 पर्यटकांच्या सुटकेचा थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

धर्मशाला येथील भागसुनाग भागातील ही घटना आहे. पंजाबचे 3 तरुण धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आले होते.

 

पाण्याच्या प्रवाहासमोर असलेल्या दगडावर उभे राहून ते फोटो काढत होते. नदीच्या पाण्याच्या वाढलेल्या पातळीचाही त्यांना अंदाज आला नाही.

 

चारही बाजूने पाण्याचा जोरदार लोंढा वाहू लागल्यावर त्यांची पाचावर धारण बसली.  त्यानंतर सुमारे 10 ते 15 स्थानिक तरुण त्यांच्या बचावासाठी आले.

 

शर्ट एकमेकांना बांधून त्याचा दोरा करून त्यांना वाचवण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version