जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
भंडाऱा -नागपूरच्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालाय. पेट्रोल पंपाजवळ कारचे टायर फुटल्यानं ड्रायव्हरनं अचानक ब्रेक दाबला. आणि याचवेळी मागून येणाऱ्या 5 गाड्यांची एकमेकांना धडक झाली. सुदैवानं यात कोणतिही जीवितहानी झालेली नाही. तर दुसरीकडे कोल्हापुरात अडहळळीमध्ये झालेल्या अपघातात 5 जण ठार तर 10 जण जखमी झालेत.
टॅक्स आणि कर्नाटक परिवहन मंडळाच्या एसटी बसमध्ये हा अपघाता झालाय. नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनाला जात असताना जाधव कुटुंबावर काळानं घाला घातलाय. तर अमरावतीमध्येही भरधाव कारच्या धडकेत एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. संजय वानखडे असं या मृत पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे. वानखडे मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना कारनं धडक दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.