‘सहराप्रमाणे तुम्ही तुमची अवस्था करून घेऊ नका’; न्यायालयाचे डीएसकेंना खडेबोल

‘सहराप्रमाणे तुम्ही तुमची अवस्था करून घेऊ नका’; न्यायालयाचे डीएसकेंना खडेबोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून 25 जानेवारी पर्यंत मुदत घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डीएसकेना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळेस सरकारी वकिलांनी डीएसके यांनी 50 कोटी रुपये जमा न केल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने याबद्दल संताप व्यक्त केला.

डीएसके यांना तुरुंगात पाठविण्यास एक क्षण सुद्धा लागणार नसून सहराप्रमाणे तुम्ही तुमची अवस्था करून घेऊ नका असे न्यायालयाने डीएसके यांना खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, आजच्या सुनावणीत डीएसके यांच्या कडून न्यायालयात पैसे जमा करण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version