गणेशोत्सवात डॉल्बीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बीवरील बंदी उठवायला स्थगिती दिली आहे.
गणेशोत्सवात गणपती विसर्जनावेळी डीजे आणि डॉल्बीवरील बंदीला अनेक गणेश मंडळांनी विरोध दर्शवला होता. तसंच यासंदर्भात ‘पाला’ म्हणजेच ‘प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशन’तर्फे हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने ही मागणी फेटाळून लावतडीजे, डॉल्बीवरील बंदी उठवण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे गणेश विसर्जनादरम्यान ढोल ताशेच वाजणार असून डॉल्बी मात्र बंदच राहाणार आहे.
डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे लोकांना या डॉल्बीवाल्यांचा त्रास सहन करावा लागतो. डॉल्बीचे आवाज ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडतात. डॉल्बीची किमान पातळी ही ध्वनी प्रदूषणाच्या कमान पातळीच्याही वरची असल्यामुळे डॉल्बी, डीजेसंदर्भातील मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली.
या आधीही डीजे बंदीवर सरकारनं आपली मुंबई उच्च न्यायालयात भूमिका मांडली होती. मात्र ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साधनांना राज्य सरकार परवानगी देणार नाही, ही राज्य सरकारची भूमिका कायम आहे. कोर्टानेही डॉल्बीला मान्यता दिली नसल्याने जर आता एखादे मंडळ डॉल्बी, डीजे वाजवत असेल, तर त्या मंडळावर त्वरीत कारवाई करण्यात येईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.