जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईसह उपनगरात पावसाळ्याच्या दिवसात इमारती कोसळण्याच्या घटना वाढायला लागल्या आहेत. या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टानं सरकारची कान उघाडणी केली आहे.
4 ऑगस्ट 2013 ला मुंब्र्याच्या शिळफाटा परिसरात इमारत कोसळून 74 जणांचा मृत्यू झाला होता. घाटकोपर आणि कल्याणमध्ये इमारत कोसळण्याच्या घटनेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हायकोर्टाने यावर सवाल उपस्थित करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.