जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापूरसह 5 जिल्ह्यांत शहरांतर्गत तूर्तास हेल्मेटसक्ती नसणार अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी दिली.
सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 15 जुलैपासून कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये शहरांतर्गत हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला होता.
मात्र, हा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला. यानंतर वाहनचालकांचं हेल्मेट वापरण्याबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून नंतर सक्ती करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.