अजब नियम; इथे कार चालवतानाही घालावे लागते हेल्मेट

अजब नियम; इथे कार चालवतानाही घालावे लागते हेल्मेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बाईक चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे असते. मात्र, फोर व्हिलर अर्थात कार चालवतना देखील हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याचे तुम्ही कधी ऐकलयं का?

मात्र, राजस्थानच्या भरतपुरमध्ये कार ड्राईव्ह करत असताना हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. हेल्मेट न घालता कार चावल्यास इथे वाहतुक पोलिस कारवाई करुन दंड आकारतात.

येथील खरेरा गावातील निवासी विष्णु शर्मा आगराहून भरतपुरला जात होते. तेव्हा चिकसाना पोलिस ठाण्यातील पोलीसांनी त्यांची कार थांबवली आणि हेल्मेट न घातल्या कारणामुळे त्यांच्याकडून 200 रूपयांचा दंड घेतला.

 मात्र, अशा प्रकारची कोणतीही दंड वसुली करण्यात आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version