मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात बुधवारी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पडणार असल्याने जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.