राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यात पावसाने कहर केला आहे. दरम्यान, राज्यात दमदार पाऊस सुरू असतांना पुढील ४८ तासांत राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टिचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, पुणे, पालघर, रायगड आणि कोकणातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि ठाण्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर हा वाढतच असूंन सध्या तरी कमी होण्याची चिन्हे नाहीत. मुंबई, पुण्यासह कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे जिल्ह्याला ऑरेंजअलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.