Maharashtra Weather : राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह विदर्भात यलो अलर्ट जारी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांतील पावसाची स्थिती

Maharashtra Weather : राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह विदर्भात यलो अलर्ट जारी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांतील पावसाची स्थिती

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबईत काहीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार आगमन केले आहे. गेल्या २४ तासांपासून शहरांमधील या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत असून पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यातही कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, कोकणातील पालघर आणि रत्नागिरीत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. ठाणे, मुंबईमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबारमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव या जिल्ह्यात हलक्या पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असून नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

हेही वाचा : Heavy Rainfall : देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस; केरळ आणि कर्नाटकात दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू, तर 8 नागरिक अद्याप बेपत्ता

तसेच पश्चिम महाराष्ट्रात सातारा घाटमाथा परिसर, पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस जाणवेल. कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सांगली जिल्ह्यात हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.  

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून आजही अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा येथे एक-दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत कोणताही अलर्ट जारी करण्यात आला नाही. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version