साताऱ्यात मुसळधार पाऊस, महू धरण भरले

साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील महू धरण १०० टक्के भरले आहे.
साताऱ्यात मुसळधार पाऊस, महू धरण भरले

२१ जुलै, २०२४ सातारा : साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील महू धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. तालुक्यातील कुडाळ करहर उडतरे सर्जापूर परिसरातील नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी महु धरणातून ७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या परिसरात येत्या २४ तासात हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version