जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत पावसाळा सुरू झाला की दरड कोसळणे, इमारती अथवा झोपड्या पडण्याचा घटना घडतात. सोमवारी अंधेरी-चांदीवली येथील संघर्षनगरमध्ये असाच काही प्रकार घडला असून येथील रस्ता खचला. यामुळे 4 घरांचे नुकसान झाले असून घरांच्या भिंतीला मोठे तडे गेले. तर सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे संघर्षनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
तसंच या परिसरात असलेल्या म्हाडाच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही पूर्ण ईमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीच्या बाजूला नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. खड्डे खोदताना मोठे आवाज होतात त्यामुळेच येथील इमारतींनासुद्धा धोका निर्माण झाला असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.