कोकणासह मुंबईत 21 सप्टेंबरपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा

कोकणासह मुंबईत 21 सप्टेंबरपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोकणासह मुंबईत 21 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान खात्याने दिले आहे.

 

उत्तर कोकणासह मुंबईतही पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.  कोकण किनारपट्टी ते कर्नाटक पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, समुद्रालगत राहणाऱ्या तसेच मच्छीमार बांधवांना दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

 

बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा द्रोणीय भाग तयार झाला असल्याने पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

 

सिंधुदुर्ग, गोवा, कोकण, रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version