Weather Update : वादळी वारा, विजांच्या कडकडाटांसह राज्यावर अवकाळीचं संकट; शेतकरी चिंतेत

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. अशातच आज गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तावली आहे.
Weather Update : वादळी वारा, विजांच्या कडकडाटांसह राज्यावर अवकाळीचं संकट; शेतकरी चिंतेत

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. मार्च महिन्याच्या पूर्वार्धार्थ उन्हाळा सुरु झाला असला तरी, महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच आज गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तावली आहे. यावेळी राज्यातील 29 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वारा, विजांच्या कडकडाटांसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली असून पिके, फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

यावेळी उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांत ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. मराठवाड्यात बीडच्या नेकनूर मांजरसुंबा परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी पाऊस कोसळणार असून पावसामुळे रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी मराठवाड्याला पुढील 24 तास धोक्याचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये ताशी 40-60 किमी वेगाने वारे वाहणार असून मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
सांगोला तालुक्यातील जुनोनी, जुजारपूर, कोळा या पूर्व भागात गेल्या दोन तासापासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये साधारण 40 मिनिटंहून अधिक काळ गारांचा देखील पाऊस जुनोनी येथे पडला. अचानक वाऱ्यासह गारांच्या पडलेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब,  पेरू  फळ पिकांचे मोठं नुकसान झालं आहे असून  पूर्व भागात झालेल्या दमदार पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांचेही हाल झाल्याचं दिसून आले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव नांदुरा तालुक्यात वादळी वारा विजांच्या कडकडाटांसह रात्री पाऊस बरसला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात सुद्धा आज सकाळपासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. 

हवामान खात्याने राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. तशा पद्धतीने राज्यभर अनेक ठिकाणी गारांसह पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांवर या पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी आणि बिजवाई कांदा पीक काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version