‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं’

‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं’

काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात सर्वांना तेव्हा मोठा धक्का बसला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ऐवजी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले. राज्यातील युती सरकारचे नेतृत्व शिंदे करत असले तरी फडणवीस हेच बॉस असल्याचे अनेकदा दिसले. आता भाजपच्या नेत्याकडून शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल एक मोठ वक्तव्य केले आहे.

पुण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला आहे. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती जो योग्य मेसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेते देवेंद्र फडणवीस होय. पाच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर कोणाला वाटले नव्हेत पण, केंद्राने निर्णय दिला आणि देवेंद्रजींनी तो मानला यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असे सांगत सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी फडणवीस यांना सॅल्यूट केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version