वो ही 'गुरू'… 'गुरूर' भी वो ही!
जय महाराष्ट्र!! pic.twitter.com/KFSWxUlYvw — Sanjay Raut (@rautsanjay61) July 13, 2022
२०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वीही संजय राऊत हे दररोज गूढ आणि सूचक अर्थाची शेरोशायरी करताना दिसून आले होते. त्यावेळी संजय राऊत यांची ट्विटस प्रचंड चर्चेत असायची. आतादेखील पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण निर्णायक टप्प्यावर असताना संजय राऊत यांनी अशाचप्रकारे ट्विटस करायला सुरुवात केली आहे. कालच संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. संजय राऊत यांनी या ट्विटच्या माध्यमातून बंडखोरांना सूचक इशारा दिला होता. ‘अब नही कोई बात खतरे की,अब सभी को सभी से खतरा हैं..’ अशा अर्थगर्भ ओळी या ट्विटमध्ये आहेत. एवढेच नव्हे तर संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि प्रियांका गांधी यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.