एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी बेपत्ता झालेत. सिद्धार्थ संघवी हे गुरूवार पासून कमला मिल येथील कार्यालयातून निघाले ते घरी पोहोचलेच नाहीत. यासंबंधी संघवी यांच्या कुटुंबीयांनी ना. म. जोशी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याप्रमाणे शोध घेण्यास सुरवात केली.
37 वर्षीय बँक अधिकारी सिद्धार्थ संघवी बुधवार पासून बेपत्ता झाल्याची तक्रार नाम जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.
सिद्धार्थ हे मलबार हिल परिसरात आपल्या पत्नी, मुलगा आणि आईवडिलांसह राहत होते.
सिद्धार्थ संघवी हे लोअर परळच्या कमला मिलमधीलच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत प्रशासकीय अधिकारी आहेत.
बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कारने ते कामाला आले. कामकाज उरकून सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान ते निघाले. मात्र त्यानंतर त्यांचा पत्ता लागत नाहीये. त्यांचा फोनही नॉट रिचेबल झाला. काहीच पत्ता न लागल्याने गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. तपासादरम्यान शुक्रवारी त्यांची कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात आढळली. या कारमध्ये रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले.
कारमधून काही पुरावे मिळतायत का, तसंच सीडीआर आणि मोबाईल लोकेशन यावरून काही माहिती मिळतेय का? याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंबई ते नवी मुंबई या रस्त्यावरील cctv चा देखील पोलीस शोध घेतायत. अचानक एक बँक अधिकारी बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे
शुक्रवारी दुपारी सिद्धार्थ संघवी यांची मारुती कार नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 11 येथे शांती हाईट्स बिल्डिंग च्या खाली सापडली. गाडीच्या आतमधील म्हणजे कारच्या सीटवर रक्ताचे डाग असल्याने खळबळ उडाली आहे. हे डाग नेमके कोणाचे ही गाडी येथे कोणी आणि कशी आणली, तसंच सिद्धार्थ संघवीसोबत नेमकं काय घडलंय याची सखोल चौकशी पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.