हर्षवर्धन श्रृंगला लवकरच नवे परराष्ट्र सचिव

हर्षवर्धन श्रृंगला लवकरच नवे परराष्ट्र सचिव

भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रृंगला (Harshvardhan Shringla) हे आता देशाचे नवे परराष्ट्र सचिव होणार आहेत. पुढील वर्षी 29 जानेवारी रोजी सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत हर्षवर्धन श्रृंगला?

हर्षवर्धन श्रृंगला हे 1984च्या बॅचचे अधिकारी आहेत.

आपल्या 35 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

याशिवाय हर्षवर्धन यांनी बांगलादेश व थायलंड या देशांमध्ये उच्चायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याशिवाय व्हिएतनाम, इस्राएल आणि दक्षिण आफ्रिका या देशातही त्यांनी भारताच्या वतीने महत्त्वाची पदांवरील जबाबदारी पार पाडली.

सध्या हर्षवर्धन श्रृंगला हे अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

काय आहेत श्रृंगला यांच्यापुढील आव्हानं?

सध्या भारतात नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात (CAA) देशात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर इतर देशांशी संबंध मजबूत करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू ठामपणे मांडणं हे प्रमुख आव्हान सध्या श्रृंगला यांच्यापुढे आहे.

पाकिस्तानशी मुत्सद्दीपणे व्यवहार करणं हे देखील श्रृंगला यांच्यापुढे आव्हान असेल.

चीनच्या भारताला ग्रासू पाहाणाऱ्या महत्त्वाकांक्षांना अत्यंत संयमीपणे मात्र तितक्याच ताकदीने वेसण घालण्याची जबाबदारी श्रृंगला यांच्यावर असेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version