भाजपात येण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी पाच कोटींची ऑफर दिली; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

भाजपात येण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी पाच कोटींची ऑफर दिली; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजप प्रवेशासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. 

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत. माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी ऑफर दिली होती. गेल्या महिन्यातील दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी ऑफर दिल्याचं आमदार जाधव यांनी सांगितलंय.

“निवडून न आल्यास विधानपरिषदेवर घेऊ, इतकंच नाही तर निवडणुकीचा सगळा खर्च आम्ही करु,” अशी ऑफरही भाजपने दिल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. 

लेटेस्ट न्यूज आणि अपडेटसाठी फॉलो करा जय महाराष्ट्रचं फेसबुक पेज – https://www.facebook.com/JaiMaharashtranews/
http://jaimaharashtranews.tv/

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version