प्रवाशांचे ‘मेगा’हाल

प्रवाशांचे ‘मेगा’हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेलापूर ते उरण या नवीन मार्गीकेसाठी हार्बर मार्गावर  4 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. 22 ते 25 डिसेंबर या कालावधित हा ब्लॉक घेण्यात आला. बेलापूरच्या पुढे जाणा-या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय झाली.

त्यातच ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी नवी मुंबई- ठाणे मार्ग देखील 25 डिसेंबरपर्यंत चार दिवस बंद करण्यात आला होता.

त्यामुळे रेल्वेही बंद आणि रस्तावाहतूकही बंद अशी कोंडी नवी मुंबईकरांची झाली होती. या चार दिवसांत नवी मुंबई जणूकाही मुंबईपासून विलग झाल्याचं दृष्य पहायला मिळालं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version