महाराष्ट्रासह देशात घरोघरी तिरंगा!

महाराष्ट्रासह देशात घरोघरी तिरंगा!

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट या काळात राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय/ निमशासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, वसतिगृहे, निवासस्थाने, आदी इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना वाढावी, देशातील सर्व समाजांमध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.

नागरिकांनी घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव जल्लोषात साजरा करावा. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना नव्याने उजाळा द्यावा, या हेतूने हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबवला जाणार आहे.

हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम सुरू असतानाच्या काळात नागरिकांनी आणि संस्थांनी ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असा आवाहन प्रशासनाने केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version