हापूस आंब्याला वाढत्या उष्णतेचा फटका

हापूस आंब्याला वाढत्या उष्णतेचा फटका

कोकणचा अर्थकारण आंबा पिकावर अवलंबून असतं मात्र हेच आंबा पिक अधिकच्या उष्णतेमुळे अडचणीत आलय.फळांचा राजा जगप्रसिद्ध हापूस आंब्याला वाढत्या उष्णतेचा फटका बसल्याने बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळून पडत आहेत. यामुळे कोकणच्या हापूसचे पहिल्या टप्प्यातील पीक धोक्यात आले आहे.

यावर्षी थंडीचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने आंबा बागेला फळधारणा झालीच नाही केवळ समुद्राकडील पट्ट्यात काही अंशी आंबा पिक आले तर उर्वरित भागात केवळ काही भागात आंबा पिकाला फुलोरा येत असतानाच उष्णतेच्या फटक्यात आंबा पीक सापडले आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. सध्या जिल्ह्यात रात्री उशिरा गारवा, तर दिवसभर प्रचंड उष्णता असे चित्र आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांत तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातील तापमान ३७ अंशांपेक्षा अधिक वाढले आहे. या वाढलेल्या तापमानाचा फटका आंबा आणि काजू पिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. तापमान ३७ अंशांपर्यंत गेल्यामुळे काही ठिकाणी आंब्याची फळे उष्णतेने भाजल्यासारखी दिसत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version