जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपुर
केंद्रीय गृह राज्यमंत्रीच जर गोळ्या घालण्याची भाषा करु लागले तर देशात कायदा-सुव्यवस्था कशी राहणार असा प्रश्न विचारण्याचं कारण चंद्रपुरातील हंसराज अहीर यांचं वादग्रस्त वक्तव्य.
‘लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या डॉक्टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू.’ अशा वल्गना अहीर यांनी केलीये
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमध्ये सरकारी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरचं उद्घाटन होतं. मात्र, सुट्ट्यांच्या मोसमात डॉक्टरांनी कार्यक्रमाला दांडी मारणं पसंत केलं. त्यामुळे नाराज गृहराज्यमंत्र्यांनी थेट कायदा हातात घेण्याचीच भाषा केलीये.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.