रामदास आठवलेंच्या भाषणानंतर हमीद अन्सारींनाही आपले हसु अनावर झाले

रामदास आठवलेंच्या भाषणानंतर हमीद अन्सारींनाही आपले हसु अनावर झाले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आपल्या अनोख्या कविता आणि भाषण शैलीमुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात.  उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या निरोप समारंभावेळी राज्यसभेत

सगळ्यांनाच आठवलेंची कविता ऐकायला मिळाली.

 

यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्या भाषणांमधून हमीद अन्सारींचे आभार मानले, पण रामदास आठवले यांनी आपल्या हटके भाषणशैलीने

सभागृहात एकच हशा पिकवला.

 

हमीद अन्सारींना निरोप देण्यासाठी उभे राहिलेल्या आठवले यांनी भाषणाची सुरूवातच त्यांच्या खास कवितेने केली. या सगळ्या भाषणानंतर हमीद अन्सारी यांनाही

आपले हसु आवरता आले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version