गारपिटीचा गावकऱ्यांना फटका; पिकासह अनेक जनावरे दगावली

गारपिटीचा गावकऱ्यांना फटका; पिकासह अनेक जनावरे दगावली

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूर जिल्हयात गेल्या तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे दहा तालुक्यांना फटका बसलाय. गारपिटीमुळे चारशे बावन गावातील पंचवीस हजार सहाशे पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा,ज्वारी, हंगामातील आंबा, टरबूज ,द्राक्ष , संत्री, मोसंबी, आदी फळबागांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, तेरा जनावरे दगावले आहेत. जिल्ह्यातील गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसात पंचनामे करून राज्य सरकाकडे पाठवणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version