…म्हणून सख्ख्या भावानेच केली भावाची गोळी घातली अन् स्वत: पोलिस ठाण्यात गेला

…म्हणून सख्ख्या भावानेच केली भावाची गोळी घातली अन् स्वत: पोलिस ठाण्यात गेला

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

शेतात ट्रॅक्टर घातला म्हणून सख्ख्या भावानेच गोळी घालून भावाची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार पंढरपूरच्या वेळापूरमध्ये घडला.

 

दत्तात्रय शिंदे असं आरोपीचं नाव असून, गोळीबार केल्यानंतर दत्तात्रय यांनी वेळापूर पोलिसांसमोर हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.

 

त्यांनंतर दत्तात्रय यांना अटक झाली असून, त्यांच्यावर 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही भावांमध्ये जमिनीचा वाद सुरु होता. बुधवारी दत्तत्रय यांच्या शेतात ट्रॅक्टर गेल्याने दोन्ही भावांमध्ये वाद झाला.

 

काहीवेळातच या वादाचे रुपांतर गोळीबारात झाले. सैन्यातून निवृत्त दत्तत्रय शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर गोळी झाडली. रुग्णालयात शशिकांत यांचा उपचारा

दरम्यान मृत्यू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version