महानिकाल महासंग्रामाचा #LIVE – गुजरातची सत्ता कुणाकडे? राहुल-मोदींच्या विजयाकडे देशाचं लक्ष

महानिकाल महासंग्रामाचा #LIVE – गुजरातची सत्ता कुणाकडे? राहुल-मोदींच्या विजयाकडे देशाचं लक्ष

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

संपुर्ण देशाचं लक्ष असलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. तसेच हिमाचल प्रदेशच्या 68 जागांचा निकालही लवकरच हाती येणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये वीरभद्र की प्रेमकुमार कुणाची येणार सत्ता याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्येच त्यांना धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसचे नेते सुद्धा ताकतीनिशी मैदानात उतरले होते.

काँग्रेस भाजप दोन्ही पक्षांनीही युद्धपातळीवर प्रचार केल्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार झाली. बऱ्याचश्या ओपिनियन पोल नुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये फार फरक राहणार नाहीये. तर एक्झिट पोलनुसार भाजपला बहुमत मिळेल. नेमकं कोण बाजी मारणार हे सोमवारी स्पष्ट होईलच पण ही निवडणूक म्हणजे राहुल गांधींसाठी अग्निपरिक्षा आहे तर मोदींसाठी प्रतिष्ठेची. 

महानिकाल महासंग्रामाचा #LIVE

– गुजरात – भाजप 99, काँग्रेस 77 तर इतर पक्ष 5 जागांवर आघाडीवर

–  भाजपचे राकेश शाह 92 हजार मत मिळवून विजयी 

– भाजपला पिछाडीवर टाकत काँग्रेसने मारली मोठी मुसंडी

– गुजरात निवडणुकीच्या कलांमुळे शेअर बाजार 850 अंकानी कोसळला

– गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या विजयासाठी हवन 

– गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी पिछाडीवर

– काँग्रेसचे अल्पेश ठाकोर – जिग्नेश मेवाणी पिछाडीवर

– हिमाचल – भाजप 44 तर काँग्रेस 21 जागांवर इतर 3

– गुजरातमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर 

– हिमाचलमध्ये भाजप एका जागेवर आघाडीवर 

– टपाल मतमोजणीत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आघाडीवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version